Breaking News

इयत्ता 10 व 12 वी च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्राभोवतीच्या परिसरात 144 कलम लागू

Section 144 applies to the area around the Certificate Examination Center in Class 10 and 12 schools
        सातारा -: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी.) दि. 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी.) दि. 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षा कालावधीत असामाजिक प्रवृत्तीचा समुदाय गोळा होवून बेकायदेशिररित्या गोंधळ व गैरप्रकार करण्याची शक्यता असते. पेपर चालू असताना विद्यार्थ्यांना बाहेरील लोकांच्याकडून कॉपी पुरविण्याचे प्रकार होतात. तसेच परीक्षा केंद्राभोवती बाहेरील लोकांनी गोंधळ केल्याने विद्यार्थ्यांचे मन विचलीत होण्याची शक्यता असते. तसेच शाळेच्या परीसरात बाहेरील झेरॉक्स सेंटरवरुन कॉपीच्या स्वरुपात झेरॉक्स करुन विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येवू नये म्हणून परीक्षा केंद्राच्या परिसरापासून 100 मिटर पर्यंतची एस.टी.डी. बुथ, फॅक्स मशिन, झेरॉक्स केंद्रे बंद करणे आवश्यक आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी तसेच परीक्षा केंद्राच्या परीसरात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा केंद्र व परिरक्षक केंद्राचे परीसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परीसरात क्रिमीनल कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदी लागू करणे आवश्यक झाले आहे.

        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सातारा जिल्ह्यातील इयत्ता 12 वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे परीक्षा केंद्र व परीरक्षक केंद्राच्या परीसरात व त्या भोवतालचे 100 मिटर परीसरात दि. 20 नाव्हेंबर 2020 चे 0.0 वाजलेपासून ते दि. 10 डिसेंबर 2020 चे 24.00 वाजेपर्यत व इयत्ता 10 वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे परीक्षा केंद्र व परिरक्षक केंद्राच्या परीसरात व त्या भावेतालचे 100 मिटर परीसरात दि. 20 नोव्हेंबर 2020 चे 0.0 वाजलेपासून ते दि. 5 डिसेंबर 2020 चे 24.00 वाजेपर्यत परिक्षार्थी परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी/कर्मचारी, सुरक्षा अधिकारी/कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तिंना प्रवेश करण्यासाठी या आदेशान्वये मनाई करीत आहे. तसेच परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरात 100 मीटर पर्यंतची एस.टी.डी. बुथ, फॅक्स मशिन, झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशिन चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत अहे.

        सदरचा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित केलेल्या सातारा जिल्ह्यातील इयत्ता 12 वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे परीक्षा केंद्र व परिरक्षक केंद्राच्या परीसरात दि. 20 नोव्हेंबर 2020 चे 0.0 वाजलेपासून ते दि. 10 डिसेंबर 2020 चे 24.00 वाजेपर्यत व इयत्ता 10 वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे परीक्षा केंद्र व परिरक्षक केंद्राच्या परीसरात दि. 20 नाव्हेंबर 2020 चे 0.0 वाजलेपासून ते दि. 5 डिसेंबर 2020 चे 24.00 वाजेपर्यत अंमलात राहील.

No comments