घरातील व्यक्तींना मारहाण करून 1 लाख 10 हजारांचा ऐवज चोरून नेला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 13 नोव्हेंबर - वाजेगाव तालुका फलटण येथे रात्री घरात घुसून, 3 इसमांनी घरातील व्यक्तींना काठीने मारहाण करून, घरातून सोन्याचे दागिने व दोन मोबाईल चोरून नेले असल्याची घटना घडली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. विरमती रावसाहेब पाटणकर रा. वाजेगाव तालुका फलटण यांच्या घरी, दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 8:30 वाजता ते 13 नोव्हेंबर 2020 रोजीच्या रात्री 0:30 वाचण्याच्या दरम्यान, 3 अज्ञात इसमांनी घरात घुसून सौ. विरमती पाटणकर यांना हाताने व त्यांच्या पतीस काठी सारख्या वस्तूने डोक्यात, कानावर, हातावर मारून जखमी केले. तसेच सौ. वीरमती यांना दमदाटी करून, त्यांच्या पर्समधील 90 हजार रुपये किमतीचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, पाच हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, 3 हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे अंगठी सोन्याची अंगठी, 5 हजार रुपये किमतीचा रियल मी टू कंपनीचा मोबाईल, 7 हजार रुपये किमतीचा विवो वाय 15 कंपनीचा मोबाईल असा एकूण 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असल्याची फिर्याद वीरमती रावसाहेब पाटणकर यांनी दिली आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि एस. एस. बोंबले हे करीत आहेत.
No comments