Breaking News

प्राप्तिकर विभागाने टाकले कोलकता, मुंबईसह तामिळनाडूत आठ ठिकाणी छापे

        नवी दिल्‍ली-मुंबई - प्राप्तिकर  विभागाने  चेन्नई येथून  घाऊक सराफा व्यवहार करणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या पकरणात  10/11/2020 रोजी  छापे टाकले. चेन्नई, मुंबई, कोलकाता, कोईम्बतूर , सालेम, त्रिची, मदुराई आणि तिरुनेलवेली येथे असलेल्या 32 कार्यालयांमध्ये  शोधमोहीम राबवण्यात आली.

        सापडलेल्या पुराव्यांमध्ये या व्यापाऱ्याने विविध ठिकाणी बेहिशेबी साठा ठेवल्याचे निदर्शनास आले.400 कोटी रुपयांचा सुमारे 814 किलोचा अतिरिक्त साठा सापडला. हा व्यवसायातील साठा असल्यामुळे प्राप्तिकर कायदा 1961 नुसार तो जप्त करता येत नाही. त्याच्याकडील माहितीनुसार 2018-19 या आर्थिक वर्षात दाखवलेल्या उत्पन्नाखेरीज अतिरिक्त  102 कोटी रुपयांचे उत्पन्न आहे. संगणकातील 2019-20, 2020-2021 या आर्थिक वर्षांतील आकडेवारी न्यायवैद्यक  साधनांचा वापर करून घेतली जात आहे. तसेच, संबंधित व्यवसायात सापडलेला 50 किलोचा  साठा जप्त करण्यात आला नाही, परंतु बेहिशेबी उत्पन्नासाठी त्याची गणना करण्यात आली .

        व्यवसायातील वास्तविक तथ्ये लपवण्यासाठी या समूहाने जेपॅक नावाचे पॅकेज ठेवले आहे. अंदाजाची  बिले / पावत्या तयार करून माल वाहतूक केली जात होती, जी वितरणानंतर नष्ट केली जात होती. ही प्राप्त माहिती बेहिशेबी व्यवहारांचा शोध घेण्यासाठी वापरली जाईल. विशेष साधने वापरणारे फॉरेन्सिक तज्ञ बेहिशेबी उत्पन्नाच्या अंतिम मूल्यमापनसाठी अधिक माहितीचा शोध घेत आहेत.

        आतापर्यंत टाकण्यात आलेल्या छाप्यांमधून अंदाजे 500 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न समोर आले आहे. यापैकी या व्यापाऱ्याने  150 कोटी रुपयांचे उत्पन्नाची स्वेच्छेने घोषणा केली होती. बिगर व्यावसायिक गुंतवणूकी तसेच नफा कमी करण्यासाठी निवास नोंदीच्या वापराच्या चौकशीचे कामही प्रगतीपथावर आहे.

No comments