सूरज कदम -पाटील यांच्या कडून १२५ कुटुंबाना दिवाळी साहीत्याचे वाटप
![]() |
दिवाळी साहित्य वाटप करताना सूरज कदम पाटील |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सध्या कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगराई ने संपूर्ण जगास वेठीस धरले आहे. प्रत्येक जण आर्थिक विवंचनेत सापडला असून सर्व सामान्य व गरीब कुटुंबाची दयनीय अवस्था आहे. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून रविवार पेठ, फल येथील सुरज कदम पाटील या सामाजिक कार्यकर्त्याने 125 कुटुंबांना दिवाळी साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
दिवाळी साहित्य वाटप करताना सूरज कदम पाटील यांनी, कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी, मास्क घाला, हात स्वच्छ धुवा व सोशल डिस्टंसिंग चे पालन करा असा संदेश दिला. काही महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत देखील केले. एक समाजसेवक म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
No comments