Breaking News

भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना फलटण तालुक्यातून मताधिक्‍य देण्याचा निर्धार

बैठकीत बोलताना जयकुमार शिंदे
Decision to give majority to BJP candidate Sangram Deshmukh from Phaltan taluka

        फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा आम्ही निर्धार केला असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी जाहीर केले.

        पुणे पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुका भारतीय जनता पक्षाची मलटण येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष मनोज कलापट, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, सुरेश निंबाळकर, जिल्हा सचिव मुक्ती शहा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे बोलत होते.

        खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कशा पद्धतीने देता येईल ‌याबाबत जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन आपल्या उमेदवाराची भूमिका समजावून सांगावी हा मतदारसंघ पारंपारिक भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे या मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येईल यामध्ये कसलीही शंका नाही. परंतु कार्यकर्त्यांनी गाफील न राहता, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हात बळकट करण्यासाठी तालुक्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य पदवीधर व शिक्षक उमेदवारांना देऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.

        यावेळी जिल्हा सरचिटणीस भरत मुळे यांनी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूकीत कशा पद्धतीने काम केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले. प्रत्येक पन्नास मतदारा मागे एक पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन उमेदवारांचा प्रचार करायचा आहे तसेच मतदारांना मतपेटी पर्यंत आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे व या विजया मध्ये फलटण तालुक्याचा सिंहाचा वाटा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 

        प्रस्ताविक नगरसेवक सचिन अहिवळे यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे युवा मोर्चाचे अध्यक्ष नानासाहेब इवरे , किसान मोर्चा चे अध्यक्ष धनंजय पवार, शहराध्यक्ष नितीन वाघ, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उषा राऊत, कामगार आघाडीचे अध्यक्ष पैलवान बाळासाहेब काशीद, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सागर अभंग, शहराध्यक्ष राजेश शिंदे, भटक्या विमुक्त जमाती सेलचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, शहर उपाध्यक्ष किरण राऊत, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष रियाज इनामदार, सागर लंबाते, सरचिटणीस सुधीर जगदाळे उपस्थित होते. आभार युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संदीप जाधव यांनी मानले.



No comments