सातारा जिल्ह्यात 49 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 349 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 23 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 49 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 349 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
349 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 28, कराड येथील 21, फलटण येथील 24, कोरेगांव येथील 31, वाई येथील 36, खंडाळा येथील 28, रायगांव येथील 1, पानमळेवाडी येथील 6, मायणी 18, महाबळेश्वर येथील 25, पाटण 9, दहिवडी येथील 22, खावली येथील 5, तळमावले 20, म्हसवड येथील 15, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 60 असे एकूण 349 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने -235699
एकूण बाधित -49879
घरी सोडण्यात आलेले -47122
मृत्यू -1683
उपचारार्थ रुग्ण-1074

No comments