Breaking News

सातारा जिल्ह्यात 20 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 19 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

20 corona patients discharged today in Satara district

        सातारा दि. 22-: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 20 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 19 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 19  जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 2 व  फलटण येथील 17, असे एकूण 19 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमुने -233425

*एकूण बाधित -49732  

*घरी सोडण्यात आलेले -47073  

*मृत्यू -1681 

 *उपचारार्थ रुग्ण-978 

No comments