नोकरीचे आमिष दाखवून महिलेस लुटले
फलटण दि. 19 ऑक्टोबर 2020 (गंधवार्ता वृत्तसेवा ) - आश्रमशाळेत नोकरीस लावतो असे सांगून एका 27 वर्षीय महिलेस लोणंद येथून घेऊन सुरवडी येथे हॉटेल मध्ये आणले, त्यांनतर तिच्याकडे असणारा सोन्याचा ऐवज, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 30,000 रुपयांचा मुद्देमाल संग्राम पाटील हे नाव धारण करणाऱ्या माणसाने चोरून त्या महिलेस जिंती नाका फलटण येथे सोडून निघून गेला असल्याची घटना घडली आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 18 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2:30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान संग्राम पाटील नाव धारण केलेल्या इसमाने, फिर्यादी माधुरी हरपळे रा. जेजुरी ता. पुणे या महिलेस, आश्रमशाळेत नोकरीस लावतो असे म्हणून, लोणंद येथून त्याच्या चारचाकी पांढऱ्या रंगाच्या गाडीत घेऊन, सुरवडी येथील निसर्ग हॉटेल रूम नंबर 109 मध्ये थांबून, फिर्यादी महिलेकडे असणारे एक तोळा वजनाचे सोन्याचे मनि मंगळसूत्र आणि 7 हजार रुपये किंमतीचा रेडमी नोट मोबाईल चोरला तसेच फिर्यादी महिलेचे बँक अकाउंट खोलण्यासाठी, फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून, महिलेकडून 3000/- रुपये घेतले. आणि त्यानंतर त्या महिलेस जिंती नाका, फलटण येथे सोडून निघून गेला असल्याची फिर्याद महिलेने फलटण पोलीस स्टेशनला दिली आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार 1271 गार्डी हे करीत आहे.
No comments