Breaking News

वर्दीतील स्त्रीशक्ती; पोलीस नाईक रेहाना नासिर शेख

        मुंबई  : कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. त्या स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न .. 

पोलीस नाईक रेहाना नासिर शेख 

        मुंबई पोलीस दलातील पोलीस नाईक रेहाना नासिर शेख यांनी पनवेल जवळील धामणी येथील ज्ञानाई माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना दहावी पर्यंतचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत दत्तक घेतले. सामाजिक जाणिवेतून लोकाभिमुख कार्य करणाऱ्या शेख यांचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणुन मला अभिमान आहे, असे गौरवोद्‌गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

No comments