Breaking News

राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरु होणार

 
मंत्रिमंडळ निर्णय : दि. ७ ऑक्टोबर २०२० -  आज   झालेल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये विविध निर्णयासह, शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये दिवाळी नंतरच शाळा सुरू कराव्यात अशी चर्चा झाली. 

         राज्य मंत्रिमंडळ बैठकीत,  राज्यातील शाळा वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे 15 ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली.  ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे.  याबाबतचा आढावा घेण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शालेय शिक्षण विभागाला दिले.

No comments