संगीता सुधाकर पवार यांचे निधन

फलटण (प्रतिनिधी) - संगीता सुधाकर पवार (वय 52) रा.जाधववाडी (फ.) ता.फलटण यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,एक मुलगी सून,नातवंडे असा परिवार आहे. संगीता पवार या नानी म्हणून परिचित होत्या. अतिशय प्रेमळ स्वभावाच्या म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या. नुकतेच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान त्यांच्यावर बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली असून त्यांच्या अचानक जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्या पञकार युवराज पवार यांच्या चुलती होत्या
No comments