Breaking News

सना खान बॉलीवूड मधून बाहेर ; मानवतेची सेवा करणार

        गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 10 ऑक्टोबर 2020) -  ‘बिग बॉस’, जय हो या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री सना खानने चित्रपटसृष्ठीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, आता ती मानवतेची सेवा करेल आणि अल्लाहच्या आदेशाचे पालन करेल असे तिने जाहीर केले आहे. 
  तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली. सनाने ही पोस्ट रोमन, इंग्रजी आणि अरबी भाषेत लिहिले आहे. तिने लिहिले आहे की - 
भावांनो आणि बहिणींनो, 
        आज मी तुमच्याशी जीवनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर बोलत आहे. मी बर्‍याच वर्षांपासून शो बिझचे जीवन व्यतीत करत होते आणि या काळात मला माझ्या चाहत्यांकडून सर्व प्रकारची  प्रसिद्धी, सन्मान आणि संपत्ती मिळाली आहे. ज्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. पण आता काही दिवसांपासून मला वाटतेय की, मानवाचा जीवनात येण्याचा हेतू फक्त संपत्ती आणि कीर्ति मिळविणे आहे का? जे बेआसरा  व असहाय्य आहेत त्यांच्या मदतीसाठी आपले जीवन जगणे कर्तव्य नाही का?
        व्यक्तीने  याचा विचार कारायला नको का ? की त्याला कोणत्याही क्षणी मरण येऊ शकते,   आणि मरणानंतर त्याचे काय होईल? मी या दोन प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. विशेषत: या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर, मृत्यूनंतर माझे काय होईल. जेव्हा मी माझ्या धर्मातील उत्तर शोधले तेव्हा मला कळले की जगातील हे जीवन खरोखर मृत्यू नंतरचे जीवन चांगले बेहतर करण्यासाठी आहे.  आणि ते जीवन यानेच चांगले बेहतर  होईल, जेव्हा जन्म देणारयाच्या (अल्लाह) आदेशानुसार जीवन व्यतीत करेल. आणि फक्त दौलत आणि शोहरत ला आपले ध्येय मानणार नाही. बलकी गुन्हेगारी पासून वाचून मानवतेची सेवा करेल आणि आपल्या जन्म देणारयाने  (अल्लाह) सांगितलेल्या मार्गावर चालेल.
        म्हणूनच आज मी जाहीर करते की आजपासून मी माझ्या शो-बिझ चे जीवन सोडून मानवतेसाठी आणि माझ्या निर्मात्याच्या हुकुमावर चालण्याचा माझा मानस आहे. मी माझ्या सर्व बहिणींना आणि भावांना विनंती करते की कोणत्याही शो-वर्कसाठी मला ऑफर देऊ नये. खूप खूप धन्यवाद!

No comments