फलटण तालुक्यात 19 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 19 corona positive
फलटण दि. 10 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 10 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 19 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 4 व्यक्ती तर ग्रामीण भागात 15 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
फलटण शहरात 4 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये , गिरवी नाका 2, लक्ष्मीनगर 1, पोलीस कॉलनी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 15 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये सोनवडी 1, जाधववाडी 1, हिंगणगाव 2, कोळकी 2, पाडेगाव 1, फडतरवाडी 2, फरांदवाडी 1, साखरवाडी 1, झिरपवाडी 2, तरडगाव 1, तडवळे 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
No comments