व्हिसा आणि वाहतूकीतील निर्बंधांमध्ये श्रेणीबद्ध शिथिलता

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2020 - कोविड-19 साथीने निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता, फेब्रुवारी, 2020 पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वाहतूक कमी करण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली होती.
आता भारतात येणाऱ्या आणि भारताबाहेर जाणाऱ्या परदेशी आणि भारतीय नागरिकांच्या अधिक प्रवर्गासाठी व्हिसा आणि वाहतुकीतील निर्बंधांमध्ये वर्गवारीनुसार शिथिलता आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणूनच, अधिकृत विमानतळ आणि बंदर इमिग्रेशन चेक पोस्ट्सद्वारे हवाई किंवा जलमार्गाद्वारे टूरिस्ट व्हिसाशिवाय इतर ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना आणि इतर परदेशी नागरिकांना इतर कोणत्याही उद्देशाने भारतात भेट देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये वंदे भारत मिशन, एअर ट्रान्सपोर्ट बबल व्यवस्था किंवा नागरी उड्डयन मंत्रालयाने परवानगी दिलेल्या कोणत्याही नॉन शेड्यूल व्यावसायिक उड्डाणांद्वारे चालविल्या जाणार्या उड्डाणांचा समावेश आहे. अशा सर्व प्रवाशांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अलगीकरण आणि इतर आरोग्य / कोविड -19 बाबतीतील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
या श्रेणीबद्ध शिथिलतेअंतर्गत, भारत सरकारने विद्यमान सर्व व्हिसा (इलेक्ट्रॉनिक व्हिसा, पर्यटक व्हिसा आणि वैद्यकीय व्हिसा वगळता) तातडीने पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा व्हिसाची वैधता कालबाह्य झाल्यास, संबंधित वर्गाचे नवीन व्हिसा संबंधित भारतीय मिशन / पोस्टवरून मिळू शकतात. वैद्यकीय उपचारासाठी भारतात येण्याची इच्छा असलेले परदेशी नागरिक वैद्यकीय व्हिसासाठी त्यांच्या वैद्यकीय परिचर्यासह अर्ज करु शकतात. या निर्णयामुळे परदेशी नागरिकांना व्यवसाय, परिषद, रोजगार, अभ्यास, संशोधन, वैद्यकीय इत्यादी विविध कारणांसाठी भारतात येणं शक्य होईल.
No comments