Breaking News

निंभोरे येथील राजाभाऊ मदने यांचा श्रीमंत रामराजेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

        फलटण -  निंभोरे ता. फलटण येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते राजाभाऊ मदने यांनी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये  जाहीर प्रवेश केला आहे.

         फलटण तालुक्याचा विकास हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळेच झाला असून आगामी काळात निंभोरे गावचा विकास करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सर्व जण कटिबद्ध असू असा विश्वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला. 

        या वेळी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सह्यायक तथा निंभोरे गावचे जेष्ठ नेते मुकुंद रणवरे (काका), गिरवीचे पै. संजय मदने व सनी राजाभाऊ मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.


No comments