Breaking News

फलटण बाजार समिती मध्ये कांद्याचे दर तेजीत - श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

        फलटण - कृषि उत्पन्न बाजार समिती फलटण मध्ये गरव्या व लाल कांद्याच्या आवकेत घट झाली असुन मंगळवार दि.20 ऑक्टोबर 2020 रोजी २३८५ पिशव्यांची आवक होवुन गरव्या कांद्याचा दर प्रति क्वि २००० ते १२००० पर्यंत व लाल कांद्याच्या दर प्रति क्वि ५०० ते ५००० पर्यंत तेजीत निघाल्याचे बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगीतले.

         सर्वाधिक गरव्या कांद्याचा दर मे.तनमन ट्रेडींग कंपनी प्रो.प्रा.श्री राजेंद्र त्रिंबक बड़े यांचे अडतीवर झालेला असुन सहभागी सर्व अडते, खरेदीदार यांचे समितीच्या वतीने अभिनंदन करणेत येत आहे. मार्केट यार्डवरील कांद्याला जिल्ह्यासह इतर राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असुन परपेठेतील खरेदीदार फलटण मार्केट यार्डवर येत असतात. त्यामुळे कांद्याची विक्री चांगल्या दराने होत आहे. तसेच फलटण यार्डवर शेतमाल आणल्यानंतर त्वरीत इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन केले जाते तसेच २४ तासाच्या आत रोख पेमेंट ही वैशिष्टये असून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविणे कामी ही बाजार समिती कायम तत्पर असून शेतकऱ्यांनी आपला कांदा स्वच्छ व प्रतवारी करुन (निवडून) आणावा असे आवाहन समितीचे सचिव श्री.शकर सोनवलकर यांनी केले आहे.

No comments