Breaking News

रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल व एन्ड्रिया गेज यांना भौतिकशास्त्राचे नोबेल प्राइज

 

Nobel Prize in Physics to Roger Penrose and the other half jointly to Reinhard Genzel and Andrea Ghez

          गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 6 ऑक्टोबर 2020) - रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज या तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातलं सन 2020 चे नोबेल प्राइज देऊन गौरवण्यात आले  आहे. या तिघांनाही ११ लाख डॉलर्सच्या रकमेसह सुवर्णपदक दिलं जाणार आहे. स्वीडनच्या स्टॉकहोम येथून आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.  

        रॉयल स्वीडिश  अकॅडमी ऑफ सायन्सेसने सन 2020 चे भौतिकशास्त्राचे नोबेल प्राइज जाहीर केले.  वन हाफ भाग  रॉजर पेनरोझ आणि बाकी वन हाफ  संयुक्तपणे रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रिया गेझ यांना जाहीर करण्यात आले आहे.  रोजर पेनरोज यांना अल्बर्ट आइंस्टीनच्या जनरल थेअरी ऑफ रिलेटिविटीबाबतची माहिती मिळवण्यासाठी मॅथेमेटिकल मेथड तयार केल्याबद्दल नोबेल दिला जाईल. तर, रेनहार्ड गेंजेल व एन्ड्रिया गेज  यांना एकत्रितपणे आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेलं अतिविशाल कृष्णविवर अर्थात ब्लॅक होल चे  रहस्य उलगडण्यासाठी नोबेल प्राइज दिले  जाईल.

        मागच्या वर्षी भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कॅनडामधील शास्त्रज्ञ जेम्स पीबल्स, अंतराळवीर मिचेर मेयर आणि डिडियर कुएलोज  यांना देण्यात आला होता.  

No comments