माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची तरडगाव येथे पहली फेरी पुर्ण दुसर्या फेरीस सुरवात
तरडगाव : (संजय किकले) - कोवीड 19 संदर्भात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची पहीली फेरी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, लोकसहभागातून पूर्ण करण्यात आली असून, दुसर्या फेरीस सुरवात करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगाव अंतर्गत तरडगाव,पाडेगाव,काळज, हिंगणगाव, नांदल,सालपे, तांबवे या गांवामधुन 14 आरोग्य पथकाच्या माध्यमातून 9322 कुटुंबातील 43294 व्यक्तिंची तपासणी करण्यात आली, यामध्ये बीपी, शुगर स्थुलता अशा 3236 व्यक्ति सारीचे, 36 आक्सीजन कमी असलेले 3 व संशयीत 28 व्यक्तिंचे नमुने घेऊन, तपासणी केली असता 17 व्यक्ती पाॅझीटीव्ह निघाल्या होत्या, त्यांना प्रा.आ. केंद्र. तरडगाव अंतर्गत. डॉ.ऐ.टी.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी उपचार चालू आहेत.
मोहीम यशस्वी रित्या राबविण्यात कोवीड19 योद्धा म्हणून संबंधीत डाॅक्टर, अंगणवाडी सेविका,नर्सेस,स्वयंसेवक यांचा मुदीता फाउंडेशन,तरडगाव यांचे वतीने तीन महीन्याचे मानधन म्हणून 1000/- रु धनादेश देण्यात आले. माजी सभापती वसंतकाका गायकवाड व मालोजीबॅकेचे संचालक सुभाषराव गायकवाड यांच्या सहकार्यातून आ. दिपक चव्हाण यांच्या हस्ते रोख रक्कम सन्मानपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले. सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या दुसर्या फेरीस सुरवात झाली असून नागरिकांनी माहिती घेण्यासाठी येणाऱ्या अधीकारऱ्याना आजार न लपवता खरी माहिती सांगुन आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे असे अवाहन आ. दिपक चव्हाण यांनी केले.
No comments