Breaking News

10 महिन्याच्या बालकाची हत्या एकतर्फी प्रेमातून

 

   गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 2 ऑक्टोबर 2020) -  काळज ता. फलटण येथून ओम  भगत या 10 महिन्याच्या बालकाचा खून  करण्यात आला होता. सदरचा खून हा एकतर्फी प्रेमातून चिडून जाऊन करण्यात आला आहे.  दरम्यान माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करून, सदर गुन्ह्यातील आरोपींचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय फलटण वकील संघाच्या वतीने घेण्यात आला असल्याचे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल कर्णे यांनी सांगितले.

   काळज ता. फलटण येथील दहा १० महिन्यांच्या बाळाचा विहिरीत टाकून खून केल्या प्रकरणी पोलिसांनी तडवळे येथील एकास रात्री उशीरा अटक केली. एकतर्फी प्रेमातून चिडून जाऊन  सदरचा खून केला आहे. रागापोटी हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

   काळज येथील 10 महिन्याच्या बाळाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसात तपासाची चक्रे फिरवून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे.  मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास काळज (ता. फलटण) येथील रामनगरमधील घरातून दहा महिन्याच्या बाळाला अज्ञाताने पळवून नेल्यानंतर खळबळ उडाली होती.

   काळज येथील झालेली घटना ही अतिशय निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारे आहे, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीतून व व्यावसायिक दृष्टीकोन बाजूला ठेवून, सदर गुन्ह्यातील आरोपींचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय फलटण वकील संघाच्या वतीने घेण्यात आला असल्याचे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल कर्णे यांनी सांगितले.


No comments