Breaking News

फलटण येथे भवानी मार्केट बेसमेंट मध्ये बेवारस प्रेत

गंधवार्ता वृत्तसेवा  (दि. 2 ऑक्टोबर 2020)  - भवानी मार्केट च्या बेसमेंटला लिफ्ट साठी सोडण्यात आलेल्या छोट्या रुममध्ये एक अज्ञात इसम मरून पडलेला आहे. दोन-तीन दिवसापासून सदरची डेडबॉडी तेथेच पडली आहे. परिसरात आता दुर्गंधी पसरू लागली आहे.

आमच्या प्रतिनिधीने तिथे जाऊन खात्री केली असता,  एसटी स्टँड समोर असणाऱ्या, भवानी मार्केट बेसमेंट मध्ये जिन्याजवळ लिफ्ट साठी सोडण्यात आलेल्या छोट्या रुममध्ये एक 40 ते 50 वयोगटातील पुरुष जातीचा अनोळखी इसम मरून पडलेला असून, त्याच्या अंगावर शर्ट नाही. सदर डेड बॉडी ही दोन ते तीन दिवस पडल्याची माहिती मिळत असून, दुर्गंधी सुटण्यास सुरुवात झालेली आहे. 


No comments