Breaking News

वकिलाचे अपहरण करून ताम्हणी घाटात निर्घृण खून

        गंधवार्ता वृत्तसेवा - पुणे बार असोसिएशनचे सदस्य असलेले ॲड. उमेश चंद्रशेखर मोरे यांचे अपहरण करून, त्यांचा निर्घुण खून करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी ॲड मोरे यांना, पुणे येथील ताम्हणी घाटात नेऊन, त्यांचा खून केला असल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान ॲड. उमेश मोरे यांची हत्या करणे हे घृणास्पद व निंदनीय कृत्य असल्याचे सांगून, फलटण वकील संघातर्फे सदर कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला असल्याचे अध्यक्ष ॲड. राहुल कर्णे यांनी संगितले आहे. 

      पुणे बार असोसिएशन चे सदस्य असलेले ॲड. उमेश चंद्रशेखर मोरे यांचे सुमारे तीन आठवड्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेले होते. त्याबाबत मोरे यांच्या भावाने शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिस अधिकारी ॲड .मोरे यांचा तपास करत होते.  ॲड. मोरे यांचा तपास जलदगतीने व्हावा याकरिता, उमेश यांचे नातेवाईक तसेच पुणे वकील संघाच्या वतीने पोलिसांकडे पाठपुरावा  करण्यात येत होता. 

        पोलिसांनी मोरे यांच्या तपासाची  चक्रे अधिक गतिमान केली, व सर्व बाबींचा विचार करून तपास सुरू केला. उमेश यांचा शोध घेण्यासाठी तीन पथकांची नेमणूक करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर उमेश यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्ती कडे चौकशी केली. शिवाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले. उमेश यांचा शोध सुरू असताना. ताम्हीणी घाटात त्यांचा खून झाल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला असून या प्रकरणी कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर आणि रोहित दत्तात्रय शेंडे या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या खून प्रकरणी कबुली दिली असल्याचे  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत संगीतले आहे. 

   बालाजी नगर येथे राहणारे उमेश चंद्रकांत मोरे यांचा खून झाला आहे.  या प्रकरणी कपिल विलास फलके (वय ३४ चिखली) दीपक शिवाजी वांडेकर (वय २८ बीड) आणि रोहित दत्तात्रय शेंडे (वय ३२ मार्केट यार्ड पुणे) या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

No comments