Breaking News

खा. रणजितसिंह यांच्याकडून पूरपरिस्थितीची पाहणी

फलटण येथे पाहणी करताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

        फलटण -( गंधवार्ता वृत्तसेवा ) - माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मानेगाव, ता. माढा तसेच फलटण तालुक्यातील काही गावांना भेटी देत तेथील परिस्थितीची पाहणी करून प्रशासनात योग्य त्या सूचना दिल्या.

        माढा मतदार संघातील तालुक्यांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला असल्यामुळे नुकसान क्साले आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी  माढा तालुक्यातील तसेच फलटण शहर व  तालुक्यातील  अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांतभाऊ देशमुख साहेब, नगरसेवक अशोक जाधव, अभिजित नाईक निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 

माढा येथे पाहणी नागरिकांशी संवाद साधताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर



No comments