फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कृषिदेव पेट्रोलियम वाखरी-ढवळपाटी येथे पेट्रोल -डिझेल विक्री सुरु
फलटण - : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या कल्पकतेतून साकारलेला "कृषिदेव पेट्रोलियम" या पेट्रोल, डिझेल, रिटेल आउटलेटच्या पेट्रोल व डिझेल विक्रीचा शुभारंभ आ. दिपकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब), सचिव, प.पु.उपळेकर महाराज देवस्थान ट्रस्ट, फलटण, व्हा.चेअरमन श्री.भगवानराव होळकर, फलटण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, किशोरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ.दिपाली निंबाळकर, सौ.प्रगती कापसे, अनिल शिरतोडे, दादासाहेब चोरमले, अमरसिंह खानविलकर उपस्थित होते.
फलटण सातारा रोड वरील पुसेगाव फाटा ते ताथवडा घाटा पर्यंत कोणताही पेट्रोल पंप नसल्याने पुसेगाव रोड वरील त्या भागातील व वाखरी-ढवळपाटी मार्केट पॉईंटच्या भोवतालची २२ गावाना सदरील पेट्रोल पंपाचा लाभ होणार आहे.
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने जलनायक श्रीमंत रामराजे नगर, पुसेगाव रोड, वाखरी (ढवळपाटी) येथे फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या "कृषिदेव पेट्रोलियम" हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.या कंपनीच्या पेट्रोल, डिझेल, रिटेल आउटलेटच्या पेट्रोल व डिझेल विक्रीचा शुभारंभ केला.
ऍग्रोवन मार्टच्या माध्यमातून मार्केट यार्ड तसेच सबयार्ड वाखरी (ढवळपाटी) येथे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक सर्व गरजा खते, बियाणे औषधे, पशुवैद्यकीय सल्ला तसेच इतर सर्व बाबी शेतकऱ्यांच्या थेट बांधापर्यंत पोहोचवणेत येणार असल्याची माहिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी दिली.
शुभारंभ प्रसंगी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सर्व मंजूर १२ पेट्रोल पंपा बाबत मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब यांनी सविस्तर माहिती घेतली. संस्थेचे उत्पन्न वाढीसाठी श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) यांनी माईंड अप्लिकेशन करुन शाश्वत पर्याय निवडले आहेत. श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) आणि त्यांचे सहकारी संचालक मंडळ, सचिव शंकरराव सोनवलकर आणि स्टाफ यांनी केलेल्या पाठपुराव्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कृषीदेव पेट्रोलियम च्या शेवटच्या शुभारंभप्रसंगी सहाय्यक निबंधक मा.श्री.सुनील धायगुडे, मार्केट कमिटी सचिव शंकरराव सोनवलकर, बाजार समिती संचालक विनायकराव पाटील, प्रकाशराव भोंगळे, मोहनराव निंबाळकर, परशुराम फरांदे, बाळकृष्ण रणवरे, चांगदेव खरात, समर जाधव, रामदास कदम, रामभाऊ ढेकळे, शिवाजीराव लंगुटे, रामचंद्र नाईक निंबाळकर, शरद रणवरे मार्केट कमिटी स्टाफ आणि भागातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments