Breaking News

इमॅन्यूएल शार्पेंटीयर व जेनिफर दौडना यांना रसायनशास्त्राचे नोबेल प्राइज


            Emmanuel Sharpentier and Jennifer Daudna win the Nobel Prize in Chemistry
        गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 7 ऑक्टोबर 2020) -   इमॅन्यूएल शार्पेंटीयर व जेनिफर दौडना या दोन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचे सन 2020 चे नोबेल प्राइज देऊन गौरवण्यात आले  आहे.  स्वीडनच्या स्टॉकहोम येथून आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.  

        रॉयल स्वीडिश  अकॅडमी ऑफ सायन्सेसने रसायनशास्त्रातील २०२० चे नोबेल प्राइज जीनोम एडिटिंगच्या पद्धतीच्या विकासासाठी इमॅन्यूएल शार्पेंटीयर आणि जेनिफर ए. दौडना यांना देण्यात आले असल्याचे जाहीर केले. इमॅन्यूअल शार्पेंची आणि जेनफिर डाउडना यांनी जीनोमच्या संपादनात महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यामुळे त्यांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात येणार असल्याचे पुरस्कार समितीने म्हटले आहे.

        माझी इच्छा आहे की, या पुरस्कारामुळे, ज्या तरुण मुली विज्ञानाचा मार्ग अवलंबू इच्छितात त्यांना एक सकारात्मक संदेश मिळेल आणि विज्ञान क्षेत्रातील  स्त्रियाना देखील त्या करत असलेल्या संशोधनातून त्यांचा प्रभाव पाडू शकतात,  हे त्यांना जाणवेल असे पुरस्कार जाहिर झाल्यानंतर  रसायनशास्त्र विजेते इमॅन्यूएल शार्पेंटीयर  यांनी व्यक्त  केले. 

        इमॅन्यूएल शार्पेंटीयर व जेनिफर दौडना या दोन महिला शास्त्रज्ञांनी जेनेटिक सीजरचा महत्वपूर्ण शोध लावला आहे. या शोधाद्वारे जनावरे, झाडे, मायक्रोऑर्गेनिज्मच्या डीएनएमध्ये बदल करुन गंभीर आजारांवर उपचार करणे शक्य होईल. कारपेंतिए बर्लिनमधील मॅक्स प्लांक यूनिट फॉर सायंस ऑफ पेथोजंसच्या डायरेक्टर आहेत आणि डौडना यूनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये कार्यरत आहेत. 

No comments