ते म्हणाले शरद पवार संपले, पण साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला - राष्ट्रवादी
शरद पवार भाषणासाठी उभे राहताच, पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पवारांच्या भाषणावर पाणी पडणार, असे सर्वाना वाटत होते. मात्र पवारांनी पावसाची पर्वा केली नाही. भर पावसात त्यांनी फटकेबाजी सुरू केली. न थांबता पवारांनी १० मिनिटं तडाखेबंद भाषण केलं. यादरम्यान त्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला झोडपून काढले.
गंधवार्ता वृत्तसेवा दी. 18 ऑक्टोबर 2020 - गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना राष्ट्रवादी कोंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे भरपावसात न थांबता शरद पवार यांनी तडाखेबंद भाषण केलं होते. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधून ट्विटर च्या माध्यमातून भाजपाची खिल्ली उडवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,
त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते.
त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती.
ते म्हणाले, शरद पवार संपले.
पण १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला
जनता चिंब भिजली
दिल्ली मात्र थिजली
सातारा_सभा_वर्षपूर्ती
असा मजकूर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आठवणी जगवल्या आहेत.
पावसात शरद पवारांची बॅटींग
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली होती, दि. 18 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी पंढरपूर, नंतर अंबाजोगाईमध्ये जाहीर सभा घेतल्यानंतर सायंकाळी शरद पवार साताऱ्यात आले. आज शेवटच्या टप्प्यात साताऱ्याची जंगी सभा होती. शरद पवार भाषणासाठी उभे राहताच, पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पवारांच्या भाषणावर पाणी पडणार, असे सर्वाना वाटत होते. मात्र पवारांनी पावसाची पर्वा केली नाही. भर पावसात त्यांनी फटकेबाजी सुरू केली. न थांबता पवारांनी १० मिनिटं तडाखेबंद भाषण केलं. यादरम्यान त्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला झोडपून काढले. नंतर त्यांनी आपला मोर्चा उदयनराजेंकडे वळवला. पवारांनी आपल्या खास शैलीत बॅटींग करीत सत्ताधारी पक्षांची धुलाई केली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साक्षात वरुणराजाने आशीर्वाद दिले आहेत आणि त्या आशिर्वादाच्या बळावर सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे, असा विश्वासही पवारांनी यावेळी व्यक्त केला होता.
No comments