Breaking News

फलटण तालुक्यात आज 23 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 23 corona positive 

        फलटण दि. 14 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 14 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 23 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 3 व्यक्ती तर ग्रामीण भागात 20 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 3 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये,  शुक्रवार पेठ 1,  मलटण 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

 ग्रामीण भागात 20 कोरोना पॉझिटिव्ह 
 यामध्ये कापशी 4, फडतरवाडी 3, विडणी 1, साठे फाटा 1, तरडगाव 1, नागेश्वरनगर 1, झिरपवाडी 1, साखरवाडी 2, बरड 1, कोळकी 1,  मुरुम 1, तडवळे 2, कापडगाव 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.


No comments