Breaking News

सातारा - दहिवडी - पंढरपूर रेल्वे सर्वेक्षणाचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश ; खा. रणजितसिंह यांच्या पाठपुराव्याला यश

        फलटण - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या कडे, मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सातारा पंढरपूर व्हाया दहिवडी म्हसवड रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, सातत्याने पाठपुरावा केला. त्याचच परिणाम म्हणून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनीसादर रेल्वे मार्ग प्रकरणी कार्यवाहीचे आदेश दिले असल्याचे जयकुमार शिंदे यांनी सांगितले.

      सातारा पंढरपूर  रेल्वे मार्ग तयार झाला तर दहिवडी - म्हसवड  या भागात होणाऱ्या औद्योगिक वसाहत तेथे येणारे उद्योग धंदे याना दळणवळण साठी फायदा होणार आहे.  शेतकरी, कामगार, तसेच पंढरपूर , म्हसवड , गोंदवले , या तीर्थक्षेत्रांमध्ये येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने हा जवळचा मार्ग सुखकर होईल. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली माढा मतदारसंघातिल रखडलेले प्रश्न मार्गी लागत असून, आता या भागाचा कायापालट होईल कायम दुष्काळी भागात रहाणारे लोकांना आर्थिक सुबत्ता येईल. यामुळे जनतेमध्ये  आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे जयकुमार शिंदे यांनी सांगितले.  
 
     सातारा पंढरपूर रेल्वेमार्गासाठी  माण तालुक्यातीचे आमदार जयकुमार गोरे यांनी यासाठी महाराष्ट्र सरकारकडे व विधानसभेमध्ये मागणी केली होती.या मागणीला यश आल्याने  आ. गोरे यांनी तसेच केंद्र सरकारचे व रेल्वे मंत्रालयाचे अभिनंदन केले आहे.

No comments