पिकावर औषध फवारणी योग्य पध्दतीने करा - ऋतुजा बोराटे
![]() |
तरडफ ता. फलटण येथील शेतकर्यांशी संवाद साधताना ऋतुजा बोराटे |
फलटण -: पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी पिकातील कीटक व रोगांचे नियंत्रण करणे गरजेचे असते आणि त्यासाठीच औषध फवारणीची गरज आहे, पण ती योग्य पदधतीने करायला हवी असे प्रतिपादन कृषिकन्या
ऋतुजा बोराटे हिने केले.
तरडफ ता. फलटण येथील शेतकर्यांना औषध फवारणीची शास्त्रीय पद्धत व फवारणी वेळी सुरक्षा किटचे महत्त्व याबाबत रेठरे बुद्रुक ता. कराड येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यायातील विद्यार्थिनी ऋतुजा गोरख बोराटे ही मार्गदर्शन करताना बोलत होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी क्षेत्रातील विद्यार्थी आपापल्या गावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्या अनुषंगाने तरडफ येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना तीने औषध फवारणी, औषध फवारणी वेळी घ्यावयाची काळजी व हाताळणी याचबरोबर कीड व्यवस्थापन, रोगव्यवस्थापन, तण व्यवस्थापन,मशागत व सुधारित तंत्रज्ञान यासह विविध विषयांची माहिती शेतकर्यांना दिली व प्रात्यक्षिके ही करून दाखवली. तसेच शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल मार्केटिंग अॅप व शेतकऱ्यांच्या गरजा पूनरवणारे अॅप याबाबतही सांगितले.सदर उपक्रमासाठी तीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी. एस. जाधव व प्राध्यापक दीपक भिलवडे यांनी मार्गदर्शन केले.
No comments