श्रीमंत संजिवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त सस्तेवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न
सस्तेवाडी - (प्रतिनिधी) - श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर मा.जिल्हा परिषद अध्यक्ष सातारा तथा अध्यक्ष महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या वाढदिवसानिमित्त ज्योतिबा मंदिर सस्तेवाडी ता. फलटण या ठिकाणी जान्हवी सामाजिक संस्था सस्तेवाडी व अपंग पंचक्रोशी संस्था काळेवाडी (डिस्कळ) यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांच्या मार्फत दि. 18 ऑक्टोबर 2020 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून सर्वांनाच देशसेवा करण्याची संधी समजून सस्तेवाडी गावात विक्रमी रक्तदान होईल अशी अपेक्षा आयोजकांनी केली होती लोकांनी त्यांना योग्य प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यावेळी आमदार दिपक चव्हाण, रामचंद्र ज्ञानेश्वर निंबाळकर, सुदाम काशिनाथ कदम, सतिषआप्पा सस्त, विश्वास(दादा) महादेव चव्हाण, विश्र्वास किसन चव्हाण, हरि ज्ञानदेव चव्हाण, भाऊसो वसंत सस्ते, शिवराज विलास कदम, जितेंद्र वसंत घाडगे, किरण लालासो चव्हाण, नितीन हनुमंत धुमाळ, जान्हवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी चव्हाण, सचिव प्रतिक्षा काशिनाथ दराडे, उपाध्यक्ष राहुल पोपट चव्हाण, अपंग पंचक्रोशी संस्थेच्या कार्याध्यक्षा अनिता काळे तसेच सह्याद्री हॉस्पिटल पुणे च्या कु. एकता कुलकर्णी मॅडम इ. उपस्थित होते
No comments