कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापूराव करे यांचे निधन

फलटण : कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणचे संचालक बापूराव हरि करे (रा.धुळदेव ता.फलटण) यांचे आज रोजी आकस्मिक दुःखद निधन झाले. बापूराव करे हे हमाल, मापाडी प्रतिनिधी संचालक म्हणून फलटण बाजार समितीत कार्यरत होते. मार्केट यार्ड फलटण येथील माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत त्यांनी पुढाकार घेऊन कामगारांचे प्रश्न सोडवले होते. त्यांच्या निधनाने बाजार समितीचे, कष्टकरी कामगारांचे कधीही भरुन येणारे नुकसान झाले आहे.
No comments