Breaking News

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीवर पुनर्नियुक्ती

 

Appointment of Ranjit Singh Naik Nimbalkar on the Standing Committee of the Ministry of Home Affairs
        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) - माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गृह मंत्रालयाच्या स्थायी समिती वर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या अंतर्गत देशातील महत्त्वाच्या ईडी, सी.बी.आय., कॅग या सारख्या तपास यंत्रणांचा समावेश आहे.

        माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गृह मंत्रालयाच्या स्थायी समिती वर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, व गृह मंत्री अमित शाह यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वर विश्वास दाखवला असून त्यांची पुढील ३ वर्षा साठी स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल माढा लोकसभा मतदार संघात आनंद व्यक्त करण्यात आला.

        खासदार रणजितसिंह यांनी मिळालेल्या सत्तेचा उपयोग करून मतदारसंघातील अनेक कामे कामे पूर्णत्वास नेली आहेत, बरेच वर्ष प्रलंबित असणारा फलटण रेल्वेचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला आहे. आता देखील ते गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीवर काम करताना आपल्या कार्याचा ठसा उमठवतील. 

1 comment: