Breaking News

सी ई टी परीक्षेसाठी फलटण आगारातून जादा बसेस

            फलटण -: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.)  फलटण आगाराचे माध्यमातून MHT-CET 2020  ऑनलाईन परिक्षा देणाऱ्या फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेनुसार जादा बसेस सोडून वेळेवर परीक्षेसाठी जाण्याची व्यवस्था करण्यात येणार असून संबंधीत विद्यार्थ्यांनी फलटण आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

       दि. १ ते २०  आक्टोंबर या कालावधीत महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत MHT-CET- 2020 सामाईक प्रवेश परीक्षा अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्र, कृषी तंत्रज्ञान प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठीची परीक्षा  महाराष्ट्रातील विविध तालुका व जिल्हास्तरिय परीक्षा केंद्रावर घेण्याचे महाराष्ट्र शासनाने योजिले आहे.

       फलटण तालुक्यातून सदर परीक्षेला जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना फलटण एस. टी. आगारामार्फत  त्यांच्या इच्छित परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचविण्यासाठी एस टी. बस सोडण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी फलटण आगाराशी संपर्क करुन आपला परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्र याविषयी माहिती द्यावी म्हणजे विद्यार्थी संख्येनुसार फलटण एस. टी. आगारातून जादा बसेसचे नियोजन करुन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेत पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

         अधिक माहितीसाठी फलटण आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ, स्थानक प्रमुख वाडेकर, वाहतूक निरीक्षक महानवर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे यांना भेटावे अथवा आगार व्यवस्थापक यांचेशी 02166 222379 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments