Breaking News

मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार ? - अमृता फडणवीस

        गंधवार्ता वृत्तसेवा ( दि. 15 ऑक्टोबर 2020 ) - मंदिरे खुली करण्याचा वादात विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेत, सरकारवर निशाणा साधला होता. या टीकेला शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी, आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीस यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले होते, आता यावर अमृता फडणवीस यांनी पुन्हा शिवसेनेवर  निशाणा साधत,  मेरे पास ना घर न द्वार,  फिर क्या उखाडेगी बुलडोजर सरकार? असा खोचक सवाल केला आहे.

        अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  सरकारवर टीका करत, महाराष्ट्रात बार व दारूची दुकाने सुरू ठेवण्यास कुठ आहे मात्र मंदिरे धोक्याच्या झोनमध्ये आहेत. ज्या लोकांना विश्वास नाही त्यांना प्रमाणपत्र देऊन स्वत: ला सिद्ध करावे लागते अशी टीका केली होती. त्या टिकेस मुंबई महानगरपालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी, अमृता फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी म्हंटल की, " 'ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का? ती कधी राजकारणात आली? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली. ती माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे, तिनं त्या भूमिकेत राहावं. मात्र आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत. आम्ही जर तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीस दिली होती. 

        शिवसेनेच्या या  प्रतिक्रियेला अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे, त्यांनी म्हटले की, 'माझ्याकडे ना घर, ना दार; मग काय उखडणार बुल्डोजर सरकार' असा प्रश्न अमृता फडणवीसांनी उपस्थित केला आहे.  मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार ? असे ट्वीट करत त्यांनी हा सवाल उपस्थित केला.

No comments