Breaking News

तुमचे औदार्य आणि प्रेम ही माझी सर्वात मोठी भेट - अमिताभ बच्चन

फिल्मीगंध written by ॲड. रोहित अहिवळे 

गंधवार्ता वृत्तसेवा  (दि. 11 ऑक्टोबर 2020) - 

        महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 78 वा वाढदिवस साजरा होत आहे. अमिताभ बच्चन हे आपल्या व्यस्त कामाच्या शेड्युल मध्येही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. रोज काही ना काही आठवणी किंवा विचार, संदेश शेअर करून, ते त्यांच्या चाहत्यांना प्रेरणा देत असतात. आज वाढदिवसानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या तमाम चाहत्यांचे आभार, धन्यवाद व्यक्त केले आहेत. हे आभार धन्यवाद देखील बिग बी नी आपल्या अलग स्टाईलने व्यक्त केले आहेत, आपल्या करोडो विविध भाषीय चाहत्यांना त्यांच्या विविध भाषेत धन्यवाद दिले आहेत. आणि म्हटले आहे की, तुमचे औदार्य आणि प्रेम ही माझी सर्वात मोठी भेट आहे.  मी या व्यतिरिक्त जादा काहीही मागू  शकत नाही. 


        महानायक अमिताभ बच्चन यांच्या या भावनिक पोस्टवर चाहत्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत यांना 78 व्यावाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली आहे.

        जोपर्यंत जीवन आहे तो पर्यंत संघर्ष आहे. जीवन आहे तोपर्यंत न थकता काम केले पाहिजे, असा इंस्टाग्राम द्वारे संदेश देत बिग बी यांनी आपल्या चाहत्यांना आपल्या यशाचे गमक सांगितले आहे.  काम न करता कोणतेही यश आपल्याला मिळत नाही. तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुम्ही झोकून देऊन काम केले पाहिजे. बिग बी स्वतः सध्या कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत काम आहेत, त्यानंतर मध्यरात्री पर्यन्त  रेकॉर्डिंग करत असतात.  बिना मेहनत के जीवन मे कुछ मिलता नही, बाबूजी कहते थे, जब तक जीवन है, तब तक संघर्ष है। असा संदेश  बिग बी यांनी चाहत्यांना दिला आहे.
        अमिताभ बच्चन हे आपल्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी लीड रोल केलेला आहे तर प्रभास आणि दीपिका पादुकोण यांच्या समवेतही नाग अश्विन यांच्या आगामी चित्रपट येत आहे. 

No comments