Breaking News

सातारा जिल्ह्यात 276 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

       सातारा दि. 15 -:  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 276 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 379 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 379 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 75, कराड येथील 16, फलटण येथील 8, कोरेगाव येथील 60,  वाई येथील 29, खंडाळा येथील 12, रायगाव येथील 30, पानमळेवाडी येथील 51, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 6, खावली येथील 21 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 56 असे एकूण 379 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 167340

एकूण बाधित -- 42698

घरी सोडण्यात आलेले -- 34774

मृत्यू -- 1408

उपचारार्थ रुग्ण -- 6516


No comments