राज्यात काल १०,७९२ नवीन कोरोना रुग्ण

काल १०,४६१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १२,६६,२४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.८६ % एवढे झाले आहे.
काल राज्यात १०,७९२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज ३०९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ७६,४३,५८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,२८.२२६ (१९.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,१०,७८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात १ लाख ५३ हजार ३३१ एवढे नवे रुग्ण, तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची संख्या ९२ हजार २४६ एवढी. याचा अर्थ नवीन बाधित रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी घट, तर बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
No comments