8 खासदारांच्यावर निलंबनाची कारवाई

गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 21 सप्टेंबर) - कृषी विधेयकांवरुन काल रविवारी राज्यसभेत अभूतपर्वू गोंधळ पाहावयास मिळाला. घोषणाबाजी आणि गदारोळात आवाजी मतदान द्वारे दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली. चर्चेदरम्यान विरोधी पक्ष खासदारांनी वेलमध्ये येऊन उपाध्यक्ष हरिवंश यांचा माईक तोडण्याचा केला, तसेच जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नियमपुस्तिका फाडण्याचा प्रयत्न केला, याची गंभीर दखल घेण्यात आली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानी रविवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. यानंतर 8 खासदारांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उपसभापींसोबत केलेल्या गैरवर्तनासाठी एका आठवड्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये टीमएमसीचे डेरेक ओब्रियन, डोला सेन, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, काँग्रेसचे राजीव सातव, रिपून बोरा आणि सय्यद नासिर हुससैन, सीपीआय (एम)चे के के रागेश आणि एल्मलारन करीम यांचा समावेश आहे.
विरोधकांकडून सादर करण्यात आलेला उपसभापतींच्या विरोधातील प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. कृषी विधेयकांवर चर्चा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून सभागृहाचे कामकाज नियोजित वेळेनंतरही चालू ठेवल्याने संतापलेल्या १२ विरोधी पक्षांनी उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव सादर केला होता.
No comments