Breaking News

अभिनेत्री निया शर्मा च्या बर्थडे ला अडल्ट केक

 

        अभिनेत्रीच्या बर्थडे पार्टीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या अभिनेत्रीच्या बर्थडे पार्टीतील केक सध्या चर्चेचा विषय ठरलाय. मित्रांनी दिलेल्या बर्थ डे पार्टी मध्ये चक्क अडल्ट केक कापण्यात आला.

        अभिनेत्री निया शर्मा हिनं नुकताच तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ तिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले. नियानं फोटो शेअर केल्यानंतर तिचा  बर्थडे केक पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.

        नियाच्या मित्र मैत्रिणींनी मिळून बर्थडे पार्टी आयोजित केली होती. नियाचा ३० वा बर्थडे असल्याने त्यांनी अडल्ट थीम ठेवली होती. आणि बर्थडे केकही अडल्टच आणला होता. मात्र, निया शर्माच्या चाहत्यांना हा केक काही आवडला नाही. चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी निया शर्माला ट्रोल केलं आहे. असे फोटो व क्लिप सोशल मीडिया वर तरी पोस्ट करू नकोस,  तू कलाकार आहेस, लोकांवर काय प्रभाव पडेल, तुझ्याकडून अशा अपेक्षा नव्हत्या, असंही नेटकर्‍यांनी कमेंट मध्ये म्हटले आहे.

No comments