Breaking News

हॉस्पिटल मधील कृत्रिम प्राण वायुचा पुरवठा खंडित होणार नाही - जिल्हाधिकारी शेखर सिंह

 
        सातारा दि. 11-  सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणावर कृत्रिम प्राण वायु पुरवठा करावा लागत आहे.  त्यात कोणताही खंड पढू दिला जाणार नाही असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.  

        सध्या समाज माध्यमातून सातारा जिल्ह्याला कृत्रिम प्राण वायुचा पुरवठा बंद केला जाईल असे एका पत्राचा हवाला देऊन बातम्या दिल्या जात आहेत.  ती प्रशासकीय तांत्रिक बाब असून त्यातून प्रशासनाने मार्ग काढला असून पूर्वी सारखाच पुरवठा सुरु राहिल असे जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले आहे,  त्यामुळे चिंता करू नये.  जनते मध्ये संभ्रम निर्माण होईल असे वृत्त पसरवू नये असे आवाहन ही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

No comments