अरुणाचलमधून बेपत्ता झालेले तरुण परतले

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेले पाचही भारतीय नागरिक चीनी सैन्याने भारतीय सैन्याकडे सोपवले आहेत. 12 दिवसांनंतर ते परतले आहेत. सैन्याने सांगितले की, हँडओव्हरची ही कारवाई किबिधू सीमेवर झाली. जवळपास एक तास कागदपत्रांची कारवाई सुरू होती. आता यांना कोरोना प्रोटोकॉलनुसार 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल. टोच सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनु बाकेर आणि गारू डिरी अशी या भारतीयांची नावं आहेत.
भारतीय सेनेनं दिलेल्या माहितीनुसार, औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चीननं या पाचही अपहृत भारतीयांना किबितू भागात भारतीय सैन्याच्या स्वाधीन केलं. मायदेशात परतलेल्या या भारतीयांना करोना व्हायरस प्रोटोकॉलनुसार, १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केलं जाणार आहे. त्यानंतर त्यांना कुटुंबाकडे सोपवलं जाईल. हे पाचही जण अरुणाचल प्रदेशातल्या अप्पर सुबनसिरीच्या नाचो भागातील रहिवासी आहेत. भारतीय सेनेसाठी पोर्टर आणि गाईडचं काम करणारे हे तरुण जंगलात शिकारीसाठी गेले असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. यावेळी, जवळच उपस्थित असलेल्या दोन स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी याची माहिती भारतीय लष्कराला दिली होती.
No comments