एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन

गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 25 सप्टेंबर 2020) - प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं आज निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते. मात्र, गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती नाजूक झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली होती.
९० च्या दशकात अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांमध्ये बालसुब्रमण्यम यांनीच प्रार्श्वगायन केलं होतं. त्यामुळं सलमान खानचा आवाज म्हणूनही त्यावेळी त्यांना म्हटंल जात होतं. केवळ गायन नव्हे तर अभिनयाची देखील बालसुब्रमण्यम यांना प्रचंड आवड होती. हम से है मुकाबला या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. बालसुब्रमण्यम यांच्या आवाजाची वेगळीच जादू प्रक्षेकांनी आणि रसिकांनी अनुभवली आहे. पत्थर के फूल, हम आप के है कौन, बागी, साजन, रोजा अशा अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत.
इलया राजा, ए.आर. रेहमान, नदीम-श्रवण, जतीन ललीत आदी अनेक संगीतकारांकडं त्यांनी काम केलं आहे. हिंदीसह तमीळ, तेलुगु, मल्याळम आदी भाषांत चाळीस हजारांहून अधिकगाणी गायली आहेत. त्यांना 2001 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला., 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला 2016 मध्ये सिल्व्हर पीकॉक पदक देऊन इंडियन फिल्म पर्सानालिटी ऑफ द इयरचा सन्मान मिळाला. 6 वेळा बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा नॅशनल अवॉर्ड मिळाला.

No comments