Breaking News

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

 

        Bihar Assembly Election Dates Announced
    बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.  
       
     बिहारचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी  पत्रकार परिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा  जाहीर केल्या. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपुष्टात येणार  आहे. एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार असून यामधील ३८ जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत. निवडणुकीत १८ लाख ८७ हजार शेतकरी मतदान करु शकतील असं  बिहारचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी  पत्रकार परिषदेत सांगितलं.
       
     1.73 लाख व्हीव्हीपॅटचा वापर केला जाईल. 46 लाख मास्क, 7.6 लाख फेस शील्ड, 23 लाख जोड्या हातमोजे आणि 6 लाख पीपीई किट वापरल्या जातील. मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. नक्षलग्रस्त भाग वगळता सर्वसाधारण भागात 7 ते 5 ऐवजी सकाळी 7 ते 6 या दरम्यान मतदान होईल.

No comments