Breaking News

जंबो कोव्हीड सेंटरसाठी सामाजिक संस्था व नागरिकांनी मदत करावी - ना. बाळासाहेब पाटील


    Social organizations and citizens should help for the Jumbo Covid Center
        सातारा दि.3 - जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. कुठलाही रुग्ण बेडपासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा प्रशासन येत्या १५ दिवसात एसटी स्टँड लगत असणाऱ्या छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयात जंबो कोव्हीड सेंटर उभे करत आहे. हा मोठा प्रकल्प असून यासाठी सातारच्या क्रेडाई या बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या कामाचा प्रशासनाला यासाठी उपयोग होणार आहे. दरम्यान, हा प्रकल्प उभा करत असताना इतर सामाजिक संस्था व समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जनतेला केलेले आवाहन 

     


No comments