प्रणबदांची कारकीर्द कायम स्मरणात राहणारी – सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर

Pranabda's career that will be remembered forever
मुंबई, दि. 7 : प्रणबदांचे व्यक्तीमत्व हे बहुआयामी असे होते. केंद्रात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. प्रणबदांचे केंद्रीय कॅबिनेटच्या सब कमिटीचे काम आपणा सर्वांसाठीच नेहमी प्रेरणादायी आहे. प्रणबदांची कारकीर्द कायमच स्मरणात राहणारी आहे, अशा शब्दात विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसेच हैद्राबाद मुक्ती संग्रामात सहभाग घेतला होता. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशिल होते. पाटबंधारे मंत्री पदाची कारकीर्द कायमस्वरूपी स्मरणात राहणारी अशी होती.
सभागृहाचे माजी सदस्य विजय मुडे, रामनाथ मोते, बलभिमराव देशमुख, युनुस हाजी जैनोद्दिन शेख, जयवंतराव ठाकरे यांच्या निधनाबद्दलही सभापतींनी शोकभावना व्यक्त केल्या.
उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, जयंत पाटील, निरंजन डावखरे, सुरेश धस, सदाभाऊ खोत, कपिल पाटील, भाई जगताप आदींनी शोक प्रस्तावावर शोक भावना व्यक्त केल्या.
No comments