निलेश राणे यांची संजय राऊतांवर जहरी टीका ...म्हणून ते त्याला फाट्यावर मारतात

गंधवार्ता वृत्तसेवा (दि 22 सप्टेंबर 2020) - माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेच्या या भूमिकेवरून खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून जहरी टीका केली आहे. कृषी विधेयका प्रसंगी राज्यसभेत शिवसेनेने घेतलेल्या विरोधी भूमिकेबद्दल भाजपाकडून टीका होत असताना, माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेच्या या भूमिकेवरून खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन आणि राज्यसभेत विरोध याचे कारण म्हणजे शिवसेनेचे लोकसभेतील खासदार संजय राऊतला किंमत देत नाही व नेता मानत नाही. संजय राऊत 99% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संजय राऊतला फाट्यावर मारतात आणि पक्षाची भूमिका मात्र बाजूला राहते'' असे ट्विट करत निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.
No comments