रिया चक्रवर्तीच्या कोठडीत वाढ; जामिनासाठी हायकोर्टात धाव

गंधवार्ता वृत्तसेवा (दि 22 सप्टेंबर 2020) - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज सप्लाय प्रकरणात कोठडीत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या न्यायालयीन कोठडीत विशेष एनडीपीएस कोर्टाने तिच्या ६ ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे. दरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी आज (मंगळवार) पूर्ण संपणार होती. रियाला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. रियाला अटक झाल्यानंतर तिने दोन वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
No comments