Breaking News

नंदकुमार भोईटे यांच्याकडून ऑक्सिजन युनिट्स खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपये

  उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचे कडे 5 लाख रुपयांचा धनादेश देताना उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे समवेत नगरसेवक पांडुरंग गुंजवटे 

       Nandkumar Bhoite donet Rs 5 lakh for purchase of oxygen units
        फलटण  दि. 4 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) -  कोरोना बाधीत रुग्णांच्यावर  उपचारार्थ  5 ऑक्सिजन युनिट्स खरेदी करण्यासाठी, फलटण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी त्यांचे बंधू कै. शामराव आबाजी भोईटे यांच्या स्मरणार्थ 5 लाख रुपयांची देणगी फलटण प्रशासनाकडे सुपूर्द केली. या 5 ऑक्सीजन युनिट्सच्या माध्यमातून 50 रुग्णांची ऑक्सिजनची सोय होणार आहे.

        रुग्णालयातील 10 बेड्स ना एकावेळी ऑक्सिजनचा पुरवठा करता येणारे नवीन युनिट मार्केटला आलेले आहे. या ऑक्सिजन युनिटची किंमत एक लाख रुपये आहे. अशी  5 ऑक्सिजन युनिट खरेदी करण्यासाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी, त्यांचे बंधू कै. शामराव आबाजी भोईटे यांच्या स्मरणार्थ 5 लाख रुपयांचा धनादेश  उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप  यांचे कडे  सुपूर्द केला. याप्रसंगी मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे  उपस्थित होते.

 फलटण प्रशासनाकडून या देणगी बद्दल उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे आभार मानून, फलटणमधील व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले.

No comments