कोरोनाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 23 सप्टेंबर) - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी(65) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. पहिल्यांदाच कोरोनाने एका केंद्रीय मंत्र्याचा बळी घेतला आहे. बेळगावचे खासदार सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भुषवत होते. 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी ट्वीटकरुन कोरोनाची लागण झाल्याची माहिती देली होती. संसदीय पावसाळी अधिवेशनासाठी सुरेश अंगडी दिल्लीलाही गेले होते. दरम्यान दिल्लीला त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांचे निधन झाले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की, कर्नाटकमध्ये पक्षाला मजबूत करण्यासाठी श्री. सुरेश अंगडी हे अपवादात्मक कार्यकर्ते होते. ते एक समर्पित खासदार आणि प्रभावी मंत्री होते, त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. माझे विचार या दुखाच्या वेळी त्याच्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह आहेत.
No comments