Breaking News

दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुल प्रीत यांना ड्रग्ज प्रकरणात समन्स

 

        गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 23 सप्टेंबर) - दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत यांची ड्रग्ज प्रकरणात चौकशी होणार असून नार्कोटिक्स ब्युरोने 3 दिवसांत हजर राहायला सांगितले आहे, संबंधिताना समन्स बजावन्यात आली असल्याचे समजते.

        अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांचा अमली पदार्थांशी संबंध समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीनं काही दलालांचीही धरपकड केली आहे. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीच्या  आधारे एनसीबीनं सिने क्षेत्रातील काही सेलिब्रेटींवर लक्ष केंद्रित केलं आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत.

        दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर जया साहा हिने अमली पदार्थविरोधी पथकाकडून  केलेल्या  चौकशीत मोठा खुलासा केला. तिने काही सेलिब्रेटींसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली जयाने दिली. 

No comments