Breaking News

संजय जी मुझे अभिव्यक्ति की पूरी आज़ादी है - कंगना रणौत

         अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाद कमी होताना दिसत नाहीये. अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली आणि हा वाद सुरू झाला. यानंतर राऊत कंगनाविरोधात पेटून उठले. आता कंगनाही त्यांना सडेतोडपणे उत्तर देत आहे. कंगनाने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांना सुनावले आहे.

        शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री कंगना रणौतचा उल्लेख ‘हरामखोर मुलगी’ असा केला. त्यांच्या या टिप्पणीवर आता कंगनाने प्रत्युत्तर दिलं आहे.

        “मी हरामखोर मुलगी आहे असं तुम्ही म्हणालात. तुम्ही सर सरकारी यंत्रणेत काम करता, तुम्हाला हे माहितच असेल की या देशात प्रत्येक दिवशी तर प्रत्येक तासाला किती महिलांचे बलात्कार होतात, किती महिलांचं शोषण केलं जातंय. कामाच्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, पतींकडून पत्नींचं शोषण होतं. या सर्व गोष्टींना तुमच्यासारखी मानसिकता जबाबदार आहे. या देशाच्या मुली तुम्हाला माफ करणार नाहीत. महिलांचं शोषण करणाऱ्यांचं सक्षमीकरण करण्याचं काम तुम्ही केलंय.

        जेव्हा आमिर खान, नसिरुद्दीन शाह यांनी म्हटलं की या देशात आम्हाला सुरक्षित वाटत नाही, तेव्हा त्यांना कोणी हरामखोर म्हटलं नाही. ज्या मुंबई पोलिसांचं मी आधी कौतुक करायचे, पण पालघर मॉब लिंचिंगसारखे प्रकरण घडल्यामुळे, सुशांतच्या हताश वडिलांची एफआयआर नोंदवून घ्यायला मागेपुढे केल्यामुळे मी त्यांची निंदा करते. हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संजयजी मी तुमची निंदा करतेय, आणि तुम्ही महाराष्ट्र नाही आहात, त्यामुळे तुम्ही हे म्हणू शकत नाही की मी महाराष्ट्राची निंदा केली आहे.  या देशाच्या अस्मितेसाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलंय, मीसुद्धा द्यायला तयार आहे. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय. भेटुयात.

No comments